धायरी.कॉम

धायरी गाव

धायरी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातले गाव आहे. येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असून ते खूप प्राचीन आहे. महाराष्ट्रातील भाविकांमध्ये या मंदिरास विशेष महत्त्व असून चैत्र महिन्यात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते.

धायरी गावात काळ भेरवनाथ मंदिर, विट्टल मंदिर, खंडोबा मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. तसेच गावात हरिभाऊ वस्ताद पोकळे शाळा, नालंदा स्कूल अश्या उत्कृष्ट दर्जाच्या अनेक शाळा आहेत. धायरी गावाला कलेचा वारसा लाभलेला आहे. कबड्डी, कुस्ती यांसारखे पारंपरिक खेळ गावात खेळले जातात. विट्टल मंदिरात कीर्तन, भजन यांसारखे कार्यक्रम चालतात. मंदिरात दरवर्षी सप्ताह भरावला जातो आणि गावातील सर्व लोक सप्ताह साठी गोळा होतात.

धायरी गाव हे झपाट्याने बदलत चालले आहे. इथे अनेक नवीन प्रकल्प येत आहेत. DSK विश्व, महावेद नगर, विजय नगर अश्या अनेक नवीन सोसायट्या तयार झाल्या असून गावाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रत्येक जण हा गावाच्या विकासासाठी हातभार लावत आहे. रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे तसेच जुन्या मंदिरांची दुरुस्ती चालू आहे.

 
 

हरिभाऊ वस्ताद पोकळे शाळा

हरिभाऊ वस्ताद पोकळे शाळेत १ ली पासून ७ वि पर्यंत वर्ग आहेत. हि शाळा सर्व सेवा सुविधांनी समृद्द आहे. शाळेच्या पहिल्या मजल्यावर वाचनालय आहे.

अधिक वाचा

महादेव मंदिर

धायरी येथील प्रचिन महादेवाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.त्याचबरोबर इथला परिसर खूप शांत निसर्गरम्य आहे. समोरच नंदीची प्रतिमा दिसते. हे मंदिर खूप वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत.

अधिक वाचा

काळ भैरवनाथ मंदिर

धायरी येथील प्रचिन काळ भैरवनाथ चे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथला परिसर खूप शांत निसर्गरम्य आहे. हे मंदिर खूप वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपामदे लोखंडी घंटा आहे

अधिक वाचा

 

 

आषाढी एकादश - पालखी सोहळा

आषाढी एकादश - म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते. पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात. ज्ञानेश्वरांचा उल्लेख 'माऊली' असा केला जातो. पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात. पालख्यांच्या या सोहळयात रंगलेल्या भक्तांना 'वारकरी' या नावाने संबोधले जाते. वारकरी हा भक्तीत गुंग, सदाचारी, निर्व्यसनी असतो अशी श्रध्दा आहे. विशेषत: गळयात तुळशी माळा घालून कपाळी गंधाचा टिळा लावून, मद्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निशिध्द मानले गेल्यामुळे 'माळकरी' वारकरी सात्विक आहे हा पक्का समज असतो.

श्री गणेश चतुर्थी

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणपती. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो. या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात. त्यापैकी एक घरी आणली जाते. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात.

योगाचे महत्व

२१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मोठे यश आहे. गेली अनेक दशके अनेक पाश्चा त्य आणि पौर्वात्य देशातील नागरिकांना योगाभ्यासात रुची निर्माण झाली आहे. बिहारचा मुंगेर येथील योगाश्रम, लोणावळ्याचे कैवल्यधाम आणि त्यानंतर गेल्या २०-३० वर्षात देशभर शेकडो योगाभ्यास केंद्रे निर्माण झाली आहेत. भारतातली योगपरंपरा पंधराशे वर्षे जुनी आहे असे मानले जाते. आज जगात ‘योगा’चे अक्षरश: हजारो प्रकार व अनेक पटीत योगाभ्यास केंद्रे आहेत. इंटरनेटवर योगा या शब्दाला लाखो संकेतस्थळे मिळतात.

शुभेच्छा